✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७८ ✍️
२० लिटर क्षमता असलेल्या १५ बादल्या ओतल्यावर एक रिकामा हौद पूर्णपणे भरतो. तर तोच रिकामा हौद पूर्णपणे भरण्यासाठी १२ लिटर क्षमता असलेल्या किती बादल्या ओताव्या लागतील?
➡️ उत्तर:-
रिकामा हौद पूर्णपणे भरण्यासाठी १२ लिटर क्षमता असलेल्या x बादल्या ओताव्या लागतील असे मानू.
∴ हौद पूर्णपणे भरण्यासाठी लागणारे पाणी = १२x लिटर
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१२x = २० × १५
∴ x = २० × १५/१२
∴ x = ५ × ५
∴ x = २५
➡️ रिकामा हौद पूर्णपणे भरण्यासाठी १२ लिटर क्षमता असलेल्या २५ बादल्या ओताव्या लागतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

