✍️ गणिताशी गट्टी क्र. ३७✍️
२० वस्तूंची एकूण खरेदी किंमत x वस्तूंच्या एकूण विक्री किमतीएवढी आहे. जर या व्यवहारातील नफा २५% असेल तर x ची किंमत किती?
➡️प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
म्हणून x वस्तूंची खरेदी किंमत = १००x रुपये.
x वस्तूंची विक्री किंमत = २० वस्तूंची खरेदी किंमत
➡️म्हणून
x वस्तूंची विक्री किंमत = २० × १००
x वस्तूंची विक्री किंमत = २००० रुपये.
x वस्तूंची विक्री किंमत = २००० रुपये.
➡️ नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
नफा = ( २००० – १००x ) रुपये
नफा = ( २००० – १००x ) रुपये
➡️( नफा / खरेदी किंमत ) × १०० = शेकडा नफा
[( २००० – १००x ) / १००x] × १०० = २५
( २००० – १००x )/x = २५
२००० – १००x = २५x
२००० = २५x + १००x
१२५x = २०००
x = २००० / १२५
➡️ x = १६
➡️ म्हणून x ची किंमत १६ आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

