✍️ गणिताशी गट्टी क्र -९ ✍️
✍️ ब्लिच केल्यामुळे आयताकृती टॉवेलची लांबी २०%ने तर रुंदी १०% ने कमी झाली तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के घट होईल?
➡️ आयताकृती टॉवेलची मूळ लांबी x एकक तर रुंदी y एकक मानू.
टॉवेलचे मूळ क्षेत्रफळ
= लांबी × रुंदी
= xy चौ.एकक
➡️ ब्लिच केल्यामुळे लांबी २०% तर रुंदी १०% ने कमी झाली.
म्हणून,
नविन लांबी
=x- (१/५)x
= (४/५)x एकक
नवीन रुंदी
= y- (१/१०)y
= (९/१०)y एकक
टॉवेलचे नवीन क्षेत्रफळ
= (४/५)x × (९/१०)y
= (३६/५०) xy
➡️ म्हणून टॉवेलच्या क्षेत्रफळातील शतमान घट
= [( मूळ क्षेत्रफळ – नवीन क्षेत्रफळ)/ मूळ क्षेत्रफळ] ×१००
= [ xy – (३६/५०) xy/xy] × १००
={ [(५०-३६)/५०]xy /xy} ×१००
= (१४/५०)×१००
= १४×२
=२८
➡️ म्हणून क्षेत्रफळात एकूण २८% घट होईल.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

