✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६ ✍️
२ डझन रबरी चेंडू ९०० रुपयांना विकल्यामुळे ६ रबरी चेंडूच्या खरेदी किमतीएवढा तोटा होतो तर एका रबरी चेंडूची खरेदी किंमत किती?
➡️ उत्तर :-
२ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत = ₹ ९०० …….(i)
या व्यवहारात होणारा तोटा = ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
➡️ म्हणून,
२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत – २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत
= ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत – ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
= २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत
➡️ २४ रबरी चेंडूची खरेदी किंमत – ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
= ९०० ……..(i वरून )
१८ रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००
➡️ म्हणून,
एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००/१८
एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ₹ ५०
म्हणून एका रबरी चेंडूची खरेदी किंमत ₹ ५० आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

