✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५१ ✍️
काल सुचिकांत ९ मुंबईकर विश्वस्तांना टीपटॉप मध्ये पार्टीसाठी घेऊन गेले. ९ जणांसाठी प्रत्येकी ५५० रुपयांची थाळी ऑर्डर केली. परंतु सुचिकांतचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्यासाठी सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा ४०५ रुपये अधिक खर्च करण्यात आले. हे सर्व बिल सुचिकांतनी भरले असल्यास त्यांना पार्टीसाठी एकूण किती रुपये खर्च आला?
➡️ उत्तर :-
सुचिकांतला पार्टीसाठी x रुपये खर्च आला असे मानू.
पार्टीला उपस्थित व्यक्तींची संख्या = १०
∴ सरासरी खर्च = x/१० रुपये.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
नऊ विश्वस्तांचा खर्च + सुचिकांतचा खर्च = पार्टीचा एकूण खर्च
∴ ९ × ५५० + [( x/१०) + ४०५ ] = x
∴ ४९५० + (x/१०) + ४०५ = x
∴ ५३५५ = x – (x/१०)
∴ ५३५५ = (१०x – x )/१०
∴ ५३५५ = ९x/१०
∴ x = ५३५५ × १०/९
∴ x = ५९५ × १०
∴ x = ५९५० रुपये.
➡️ सुचिकांतला पार्टीसाठी ५९५० रुपये खर्च आला.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

