✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५२ ✍️
आकांक्षा व स्वरा यांच्या वयाची बेरीज २६ वर्षे आहे. तीन वर्षानंतर आकांक्षाचे वय हे स्वराच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आकांक्षा स्वरापेक्षा किती वर्षाने मोठी आहे?
➡️ उत्तर :-
आकांक्षाचे वय x वर्षे तर स्वराचे वय y वर्षे मानू.
∴ तीन वर्षांनंतर आकांक्षाचे वय = ( x + ३ ) वर्षे.
आणि पाच वर्षांपूर्वी स्वराचे वय = ( y – ५ ) वर्षे.
➡️ पहिल्या अटीवरून,
x + y = २६ ………(i)
➡️ दुसऱ्या अटीवरून,
( x + ३ ) = २ ( y – ५ )
∴ x + ३ = २y – १०
∴ x – २y = -१० -३
∴ x – २y = -१३ ………(ii)
➡️ समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून
३y = ३९
∴ y = ३९/३
∴ y = १३ वर्षे.
∴ y = १३ ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून.
∴ x + १३ = २६
∴ x = २६ -१३
∴ x = १३ वर्षे.
➡️ त्या दोघी एकाच वयाच्या आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

