✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५५ ✍️
१८० रुपयांस छत्री विकली तर चंपकला १०% तोटा होतो. १०% नफा मिळविण्यासाठी त्याने छत्री किती रुपयाला विकावी?
➡️ उत्तर :-
छत्रीची खरेदी किंमत x रुपये मानू.
१०% तोटा = x चे १०%
= x × १०/१००
= x/१० रुपये.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
खरेदी किंमत – विक्री किंमत = तोटा
∴ x – १८० = x/१०
∴ x – x/१० = १८०
∴ ( १०x – x )/१० = १८०
∴ ९x/१० = १८०
∴ x = १८० × १०/९
∴ x = २० × १०
∴ x = ₹ २००
∴ छत्रीची खरेदी किंमत = ₹ २००
➡️ १०% नफा मिळवण्यासाठी छत्री y रुपयांना विकावी लागेल असे मानू.
१०% नफा = २०० चे १०%
= २०० × १०/१००
= २ × १०
= ₹ २०
➡️ आपल्याला माहिती आहे की,
विक्री किंमत – खरेदी किंमत = नफा
∴ y – २०० = २०
∴ y = २० + २००
∴ y = ₹ २२०
➡️ १०% नफा मिळवण्यासाठी चंपकला छत्री २२० रुपयांना विकावी लागेल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

