✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५६ ✍️
अजय शेळीपालन केंद्रातील तीन चतुर्थांश शेळ्या शेतात चरत आहेत. उर्वरित शेळ्यांतील दोन तृतीयांश शेळ्या गोठ्यातच हुंदडत आहेत. उरलेल्या १० शेळ्या हौदातील पाणी पीत आहेत. तर अजय शेळीपालन केंद्रात एकूण किती शेळ्या आहेत?
➡️ उत्तर :-
अजय शेळीपालन केंद्रात एकूण x शेळ्या आहेत आहेत असे मानू.
शेतात चरणाऱ्या शेळ्या = ३x/४
∴ उर्वरित शेळ्या = x – ३x/४ = (४x – ३x)/४ = x/४
∴ गोठ्यातच हुंदडणाऱ्या शेळ्या = (२/३) ( x/४) = x/६
पाणी पिणाऱ्या शेळ्या = १०
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = (३x/४) + ( x/६) + १०
∴ x = ( ९x + २x + १२० )/१२
∴ १२x = ११x + १२०
∴ १२x – ११x = १२०
∴ x = १२०
➡️ अजय शेळीपालन केंद्रात एकूण १२० शेळ्या आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

