✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५७ ✍️
स्मयन आणि अश्विक या आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन विवेक घराशेजारी असलेल्या वर्तुळाकार ट्रॅकवर मॉर्निंग वॉक ( सकाळी चालणे ) साठी रोज घेऊन जातो. विवेकला एक फेरी मारण्यासाठी २ मिनिटे , स्मयनला अडीच मिनिटे तर अश्विकला ३ मिनिटे लागतात. तिघांनी एकाच वेळी चालायला सुरुवात केल्यानंतर किती वेळाने ते सुरुवातीच्या ठिकाणी एकत्र येतील?
➡️ उत्तर :-
विवेकला एक फेरी मारण्यासाठी लागणारा वेळ = २ मिनीटे = २ × ६० = १२० सेकंद
स्मयनला एक फेरी मारण्यासाठी लागणारा वेळ = २.५ मिनीटे = २.५ × ६० = १५० सेकंद
अश्विकला एक फेरी मारण्यासाठी लागणारा वेळ = ३ मिनीटे = ३ × ६० = १८० सेकंद
➡️ आता,
१२० = २ × २ × २ × ३ × ५
१५० = २ × ३ × ५ × ५
१८० = २ × २ × ३ × ३ × ५
ल.सा.वि. = २ × ३ × ५ × २ × २ × ३ × ५
= १८००
१८०० सेकंद = ( १८००/६०) मिनिटे = ३० मिनिटे
विवेक , स्मयन, अश्विक यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर ३० मिनिटांनी पुन्हा एकत्र येतील.
परंतु हा पर्याय प्रश्नात दिलेला नाही.
याचा अर्थ योग्य पर्याय हा ३० च्या पटीतील संख्या असणार.
∴ योग्य पर्याय = ६०
➡️ विवेक, स्मयन आणि अश्विक यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर ६० मिनिटांनी एकत्र येतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

