✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५८ ✍️
साक्षी पार्क हौसिंग सोसायटीतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या मुलांना ₹ १०० तर इतर सहभागी स्पर्धकांना ₹२० चे पारितोषिक देण्यात आले. परितोषिकांसाठी एकूण ₹ १६०० खर्च झाले. सोसायटीमधील ४८ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला असेल तर विजेत्यांची संख्या किती?
➡️ उत्तर :-
साक्षी पार्क सोसायटीमधील विजेत्या मुलांची संख्या x मानू.
∴ इतर सहभागी स्पर्धकांची संख्या = (४८ – x )
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१००x + २०( ४८ – x ) = १६००
∴ १००x + ९६० – २०x = १६००
∴ ८०x = १६०० – ९६०
∴ ८०x = ६४०
∴ x = ६४०/८०
∴ x = ८
➡️ साक्षी पार्क सोसायटीमधील चित्रकला स्पर्धेतील विजेत्या मुलांची संख्या ८ आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment