✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६० ✍️
एक काम १८ माणसे २५ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम पूर्ण करण्यासाठी ३० माणसांना किती दिवस लागतील?
➡️ उत्तर :-
३० माणसांना ते काम पूर्ण करण्यास x दिवस लागतील असे मानू.
माणसे वाढली की काम पूर्ण करण्यासाठी दिवस कमी लागतील तर माणसे कमी झाली की काम पूर्ण करण्यासाठी दिवस जास्त लागतील.
➡️ येथे व्यस्त प्रमाण आहे.
∴ ३० × x = १८ × २५
∴ x = ( १८ × २५ )/३०
∴ x = ३ × ५
∴ x = १५ दिवस.
➡️ ते काम पूर्ण करण्यास ३० माणसांना १५ दिवस लागतील.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment