✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६१ ✍️
एक हौद भरण्यासाठी तीन नळ आहेत. तो हौद पूर्ण भरण्यासाठी पहिल्या नळाला ३५ मिनिटे, दुसऱ्या नळाला १५ मिनिटे तर तिसऱ्या नळाला २१ मिनिटे लागतात. तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल?
➡️ उत्तर :-
तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद पूर्ण भरण्यासाठी x मिनिटे लागतील असे मानू.
∴ तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद एका मिनिटात १/x इतका भरेल.
हौद पूर्ण भरण्यासाठी पहिल्या नळाला ३५ मिनिटे लागतात.
∴ पहिल्या नळाने हौद एका मिनिटात १/३५ इतका भरतो.
हौद पूर्ण भरण्यासाठी दुसऱ्या नळाला १५ मिनिटे लागतात.
∴ दुसऱ्या नळाने हौद एका मिनिटात १/१५ इतका भरतो.
हौद पूर्ण भरण्यासाठी तिसऱ्या नळाला २१ मिनिटे लागतात.
∴ तिसऱ्या नळाने हौद एका मिनिटात १/२१ इतका भरतो.
∴ तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद एका मिनिटात [(१/३५) + (१/१५) + (१/२१)] इतका भरेल.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१/x = (१/३५) + (१/१५) + (१/२१)
∴ १/x = ( ३ + ७ + ५ )/१०५
∴ १/x = १५/१०५
∴ १/x = १/७
∴ x = ७ मिनिटे
➡️ तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो हौद पूर्ण भरण्यासाठी ७ मिनिटे लागतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

