✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६२ ✍️
एक रेल्वे ३०० मी लांबीच्या पूलाला २५ सेकंदात तर सिग्नलच्या खांबास १० सेकंदात ओलांडते. जर ती रेल्वे एकसमान वेगाने जात असेल तर तिची लांबी किती?
➡️ उत्तर :-
रेल्वेची लांबी x मी आहे असे मानू.
वेग = अंतर / वेळ हे आपल्याला माहिती आहे.
➡️ पूल ओलांडण्यासाठी रेल्वेला कापावे लागणारे अंतर = ( x + ३०० ) मी
∴ पूल ओलांडत असतानाचा रेल्वेचा वेग = ( x + ३००)/ २५ मी प्रति सेकंद.
तसेच,
सिग्नलचा खांब ओलांडत असतानाचा रेल्वेचा वेग = x/१० मी प्रति सेकंद.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x/१० = ( x + ३००)/२५
∴ २५x = १०(x + ३००)
∴ २५x = १०x + ३०००
∴ २५x – १०x = ३०००
∴ १५x = ३०००
∴ x = ३०००/१५
∴ x = २०० मी
➡️ रेल्वेची लांबी २०० मी आहे.
© अजित तिजोरे – ८९८७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

