✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६३ ✍️
सुंदर माझा वर्ग या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल इयत्ता नववीच्या ६२ विद्यार्थ्यांना चॉकलेटची पेटी देण्यात आली. पेटीत एकूण १६३ चॉकलेट होती. ती सर्व चॉकलेट मुलांना प्रत्येकी दोन तर मुलींना प्रत्येकी तीन याप्रमाणे वाटण्यात आली. इयत्ता नववीच्या वर्गात एकूण किती मुली आहेत?
➡️ उत्तर :-
इयत्ता नववीच्या वर्गातील मुलांची संख्या x तर मुलींची संख्या y मानू.
➡️ उदाहरणातील पहिल्या अटीनुसार,
x + y = ६२ ……..(i)
➡️ उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार,
२x + ३y = १६३ ……(ii)
➡️ समीकरण (i) ला २ ने गुणून
२x + २y = १२४ ……..(iii)
➡️ समीकरण (ii) मधून समीकरण (iii) वजा करून
y = ३९
➡️ इयत्ता ९ वीच्या वर्गात ३९ मुली आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

