✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७६ ✍️
संतोषने ५०,००० रुपये गुंतवून एक धंदा सुरू केला. चार महिन्यानंतर ५०००० रुपये गुंतवून आशिषने त्याच्यासोबत भागीदारी केली. वर्षाच्या शेवटी त्यांना ३५००० रुपये नफा झाला तर त्यात आशिषचा वाटा किती?
➡️ उत्तर :-
संतोषने ₹ ५०००० बारा महिने तर आशिषने ₹ ५०००० आठ महिने गुंतवले.
∴ संतोष आणि आशिष यांच्या भांडवल गुंतवणूकीचे गुणोत्तर
= ५०००० × १२ : ५०००० × ८
= १२ : ८
= ३ : २
∴ ज्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक त्याच प्रमाणात नफ्याचे वाटप होईल.
➡️ समान पट x मानू.
∴ संतोषला मिळणारा वाटा = ३x रुपये
तर,
आशिषला मिळणारा वाटा = २x रुपये
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
३x + २x = ३५०००
∴ ५x = ३५०००
∴ x = ३५०००/५
∴ x = ७०००
➡️ आशिषला मिळणारा वाटा
= २x
= २ × ७०००
= ₹ १४०००
➡️ त्या नफ्यातून आशिषच्या वाट्याला ₹ १४००० येतील.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

