✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७९ ✍️
चंपक ने सरळव्याजाने काही रक्कम द.सा. द. शे. ८.५ दराने ४ वर्षांसाठी कर्जाने घेतली. जर त्याने एकूण ₹ १५३०० व्याज भरले असेल तर कर्जाची रक्कम किती?
➡️ उत्तर:-
कर्जाची रक्कम x रुपये आहे असे मानू.
आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = ( मुद्दल × व्याजदर × मुदत )/१००
∴ मुद्दल = ( सरळव्याज × १००)/(व्याजदर × मुदत )
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x = ( १५३०० × १००)/( ८.५ × ४)
∴ x = १८०० × २५
∴ x = ₹ ४५०००
➡️ चंपकने ₹ ४५००० कर्जाने घेतले होते.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

