✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६३ ✍️
एका बोटीचा संथ पाण्यातील वेग १६ किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग ४ किमी प्रतितास आहे. तर ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने १५ मिनिटात किती अंतर कापेल?
➡️ उत्तर :-
बोटीचा संथ पाण्यातील वेग = १६ किमी प्रतितास
प्रवाहाचा वेग = ४ किमी प्रतितास
➡️म्हणून,
बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सापेक्ष वेग = १६ – ४ = १२ किमी प्रतितास
६० मिनिटे = १ तास
➡️ म्हणून,
१५ मिनिटे = १/४ तास ……( समीकरणास ४ ने भागून )
➡️ वेग = अंतर / काल
म्हणून,
अंतर = वेग × काल
अंतर = १२ × (१/४)
अंतर = ३ किमी.
➡️ म्हणून ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने १५ मिनिटात ३ किमी अंतर कापेल.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

