✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७० ✍️
राजेशकडे काही आंबे आहेत. त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून जेवढे खाल्ले त्याहून ६०% जास्त आंबे राजेशने विकले. जर त्याने ८० आंबे विकले असतील तर राजेश आणि मित्रकंपनीने किती आंबे खाल्ले?
➡️ उत्तर :-
राजेश आणि मित्र कंपनीने x आंबे खाल्ले असे मानू.
राजेशने विकलेले आंबे
= x + x चे ६०%
= x + ६०x/१००
= (१००x + ६०x)/१००
= १६०x/१००
= ८x/५
➡️दिलेल्या माहितीनुसार,
८x/५ = ८०
x = ८०×५/८
x = ५०
➡️ म्हणून राजेश आणि मित्र कंपनीने एकूण ५० आंबे खाल्ले.
@अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

