✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७३ ✍️
योगेश, मंगेश आणि संदेश या तिघांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला. योगेशच्या भांडवलाची तिप्पट मंगेशच्या भांडवलाच्या दुप्पट आहे. मंगेशचे भांडवल संदेश च्या भांडवलाच्या तिप्पट आहे. जर त्या व्यवसायात त्यांना ₹१,८०,००० नफा झाला असेल तर त्यात योगेशचा वाटा किती?
➡️ उत्तर :-
संदेश चा नफ्यातील वाटा ₹ x मानू.
मंगेशचा वाटा = ₹ ३x ……..(i)
३× योगेशचा वाटा = २ × मंगेशचा वाटा
३× योगेशचा वाटा = २ × ३x ……(i वरून)
योगेशचा वाटा = २ × ३x / ३
➡️ म्हणून,
योगेशचा वाटा = ₹ २x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
२x + ३x + x = १८००००
६x = १८००००
x = १८००००/६
x = ₹ ३०,०००
➡️ म्हणून,
योगेशचा वाटा = २x
योगेशचा वाटा = २ × ३००००
योगेशचा वाटा = ₹ ६०, ०००
➡️ म्हणून त्या नफ्यात योगेशचा वाटा ₹ ६०,००० आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

