✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७९ ✍️
रमेशने सुरेशकडून सरळव्याजाने द. सा. द. शे. १२ दराने तीन वर्षासाठी ₹ ८५,००० कर्जाने घेतले. त्यात आपल्याजवळची काही रक्कम टाकून रमेशने ती सर्व रक्कम त्याच दिवशी राकेशला सरळव्याजाने द.सा.द.शे. १४ दराने तीन वर्षांसाठी कर्जाने दिले. या संपूर्ण व्यवहारात त्याला ₹ ९३०० मिळाले तर त्याने स्वतःजवळील किती रक्कम टाकली होती?
➡️ उत्तर :-
रमेशने x रुपये टाकले होते असे मानू.
आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = मुद्दल (म) × व्याजदर (द) × मुदत (क)/१००
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
[( ८५००० + x ) × १४ × ३]/१०० – [८५०००× १२ × ३]/१०० =९३००
[( ८५००० + x ) × १४ × ३] – [८५०००× १२ × ३] =९३०० × १००
[( ८५००० + x ) × ४२ ] – [८५०००× ३६] = ९३००००
८५०००×४२ + ४२x – ८५०००×३६ = ९३००००
४२x + ८५०००( ४२ – ३६ ) = ९३००००
४२x + ८५००० × ६ = ९३००००
४२x + ५१०००० = ९३००००
४२x = ९३०००० – ५१००००
४२x = ४२००००
x = ४२००००/४२
x = १००००
➡️म्हणून रमेशने त्यात १०००० रुपयांची भर घातली होती.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

