✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८१ ✍️
कमला आणि विमला १०० मीटर शर्यत लावतात. कमलाचा वेग १५ किमी प्रतितास आहे. ती (कमला) विमला १५ मीटर पुढे गेल्यानंतर धावायला सुरुवात करते तरी विमलाला १० सेकंदाने हरवते तर विमलाचा वेग किती?
➡️ उत्तर :-
आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / वेळ
कमलाचा वेग १५ किमी प्रतितास आहे.
१५ किमी प्रतितास = १५ × १०००/ (६० ×६०) मीटर / सेकंद
१५ किमी प्रतितास = १५ × ५/१८ मी/से
१५ किमी प्रतितास = ७५ / १८ मी/ से
➡️ म्हणून,
१०० मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी कमलाला लागलेला वेळ
= १००/(७५/१८) सेकंद
= ४ × १८/३ सेकंद
= २४ सेकंद
कमला विमलाला १० सेकंदाने हरवते शिवाय विमला१५ मीटर पुढे गेल्यावर धावायला सुरुवात करते.
➡️ म्हणजेच,
विमलाला ८५ मीटर धावण्यासाठी २४ + १० = ३४ सेकंद लागतात.
➡️ म्हणून,
विमलाचा वेग = ८५ / ३४ मीटर प्रति सेकंद
विमलाचा वेग = ( ८५/३४) ( ६०×६०/१०००) किमी प्रतितास
विमलाचा वेग = (८५/३४) (१८/५) किमी प्रतितास
विमलाचा वेग = ९ किमी प्रतितास
➡️ म्हणून विमलाचा धावण्याचा वेग ९ किमी प्रतितास आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

