✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८२ ✍️
एका पेन्सिलचा दोन पंचमांश (२/५) भाग काळ्या रंगाने तर उर्वरित भागाच्या एक तृतीयांश (१/३) भाग निळ्या रंगाने रंगविलेला आहे. बाकी उरलेला ३.२ सेमी भाग पांढऱ्या रंगाने रंगवला असेल तर पेन्सिलची एकूण लांबी किती?
➡️ उत्तर :-
पेन्सिलची एकूण लांबी x सेमी आहे असे मानू.
काळ्या रंगाने रंगविलेला भाग = (२/५)x सेमी.
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [ x – (२/५)x]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [ (५x – २x) /५]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [३x/५]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = x/५ सेमी
पांढऱ्या रंगाने रंगविलेला भाग = ३.२ सेमी
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(२x/५) + (x/५) + ३.२ = x
(३x/५) + ३.२ = x
x – (३x/५) = ३.२
(५x-३x)/५ = ३.२
२x = ३.२ × ५
x = १६/२
x = ८ सेमी
➡️ म्हणून पेन्सिलची एकूण लांबी ८ सेमी आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

