✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९ ✍️
एका फळविक्रेत्याला साडेतीन डझन केळी विकल्यानंतर ८ केळीच्या विक्री किमतीएवढा तोटा होतो. तर शेकडा तोटा काढा.
➡️ उत्तर :-
साडेतीन डझन केळी = ३.५ × १२ = ४२ केळी
तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत
४२ केळ्यांची खरेदी किंमत – ४२ केळ्यांची विक्री किंमत = ८ केळ्यांची विक्री किंमत
४२ केळ्यांची खरेदी किंमत = ४२ केळ्यांची विक्री किंमत + ८ केळ्यांची विक्री किंमत
४२ केळ्यांची खरेदी किंमत = ५० केळ्यांची विक्री किंमत …..(i)
एका केळ्याची खरेदी किंमत x रुपये मानू.
➡️ म्हणून,
५० केळ्यांची खरेदी किंमत = ५० x रुपये
५० केळ्यांची विक्री किंमत = ४२x रुपये ….(समी i वरून)
➡️ म्हणून,
शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत )× १००
शेकडा तोटा = [(५०x – ४२x)/५०x] × १००
शेकडा तोटा = [ ८x / ५०x ] × १००
शेकडा तोटा = १६
➡️म्हणून त्या फळविक्रेत्याला शेकडा तोटा १६ झाला.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

