✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४९ ✍️
परीक्षेत एका संख्येला २५ ने गुणा असा प्रश्न होता. तेजसने नजरचुकीने ५२ ने गुणल्यामुळे त्याचे उत्तर मूळ उत्तरापेक्षा ४८६ ने जास्त आले. तर ती संख्या कोणती?
➡️उत्तर :-
ती संख्या x आहे असे मानू.
२५ ने गुणल्यामुळे येणारे उत्तर = २५x
५२ ने गुणल्यामुळे येणारे उत्तर = ५२x
➡️ दिलेल्या माहितीवरून,
५२x – २५x = ४८६
२७x = ४८६
x = ४८६ / २७
x = १८
➡️ म्हणून ती संख्या १८ आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

