✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०९ ✍️
कलिकाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय २५ वर्षे होते. आईचे आजचे वय कलिकाच्या आजच्या वयाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे. तर कलिकाच्या आईचे आताचे वय काढा.
➡️ उत्तर :-
कलिकाचे आजचे वय x वर्ष आहे असे मानू.
➡️ म्हणून,
कलिकाच्या आईचे आताचे वय = (३x – ३ ) वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(३x – ३) – x = २५
∴ ३x – ३ – x = २५
∴ २x = २५ + ३
∴ २x = २८
∴ x = २८/२
∴ x = १४
➡️ म्हणून,
कलिकाच्या आईचे आताचे वय
= ३x – ३
= ३ × १४ – ३
= ४२ – ३
= ३९
➡️ म्हणून कलिकाच्या आईचे आताचे वय ३९ वर्षे आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

