✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३ ✍️
मिहीर प्रवाहाच्या दिशेने ५ किमी प्रतितास तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ किमी प्रतितास या वेगाने पोहतो तर मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग किती?
➡️ उत्तर :-
मिहीरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
प्रवाहाच्या दिशेने सापेक्ष वेग = (x + y) किमी प्रतितास
तर,
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सापेक्ष वेग = ( x – y) किमी प्रतितास
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x + y = ५…………….(i)
x – y = २…………….(ii)
➡️ समीकरण (i) व (ii) यांची बेरीज करून,
२x = ७
∴ x = ७/२
∴ x = ३.५ किमी प्रतितास
➡️ म्हणून मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग ३.५ किमी प्रतितास आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

