✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५१ ✍️
३० मे २०२० रोजी रत्नागिरीत होणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील विश्वस्तांनी रेल्वेने जायचे ठरवले. तिकीटखर्चापोटी लागणारे ५६७० रुपये सर्वांकडून समान रक्कम घेऊन मृणाल यांनी किरण आणि वैशाली यांच्याकडे जमा केली. परंतु नागपूरकर अमृताताईंनी मुंबईहून रत्नागिरीस जाण्याची ईच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्या तिकिटासाठी ( मुंबई ते रत्नागिरी ) मुंबईच्या प्रत्येक विश्वस्तांना ७० रुपये आणखी द्यावे लागले तर मुंबईतील ज्ञामप्रचे किती विश्वस्त सभेसाठी जाणार आहेत?
➡️ उत्तर :-
मुंबईहून सभेसाठी x विश्वस्त जाणार आहेत असे मानू.
तिकीटखर्चापोटी जमा केलेली रक्कम = ₹ ५६७०
➡️ म्हणून,
प्रतिव्यक्ती तिकीट खर्च = ₹ ५६७०/x …….(i)
अमृताताईंच्या तिकिटासाठी जमा केलेली एकूण रक्कम = ₹ ७०x
➡️ म्हणून,
प्रतिव्यक्ती तिकीट खर्च = ₹ ७०x ……….(ii)
➡️ समीकरण (i) व (ii) वरून,
७०x = ५६७० / x
x × x = ५६७० / ७०
x^२ = ८१
x = ९ ……….( वर्गमूळ घेऊन )
म्हणून मुंबईतील ९ विश्वस्त सभेसाठी जाणार आहेत.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

