✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३९ ✍️
दत्तू नाव वल्हवत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४ तासात ४० किमी अंतर कापतो आणि तेवढ्याच वेळात प्रवाहाच्या दिशेने ८८ किमी जातो. तर प्रवाहाचा वेग काढा.
➡️ उत्तर :-
दत्तूचा नाव वल्हविण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास आहे असे मानू.
∴ प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग = ( x + y ) किमी प्रतितास तर
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग = ( x – y ) किमी प्रतितास
➡️ आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / काळ
➡️ पहिल्या अटीनुसार,
x – y = ४० /४
∴ x – y = १० ………(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
x + y = ८८ / ४
∴ x + y = २२……..(ii)
➡️ समीकरण ( ii ) मधून समीकरण ( i ) वजा करून,
२y = १२
∴ y = १२/२
∴ y = ६ किमी प्रतितास
➡️ प्रवाहाचा वेग ६ किमी प्रतितास आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

