✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४४ ✍️
एका बांधकाम साईटवर मुकादम म्हणून काम पाहणाऱ्या संजयला ३ दिवसांचा ५००० रुपये पगार मिळतो. त्याच साईटवर गवंडीकाम करणाऱ्या राधू मिस्तरीला ५ दिवसांचे ६००० रुपये मिळतात. काही दिवसानंतर संजयने ७००० रुपये शासकीय रुग्णालयाला दान देतो तेंव्हा दोघांकडील रक्कम समान होते. तर हे किती दिवसांत घडते? ( त्या दोघांकडे आधीची कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती. )
➡️उत्तर :-
दोघांकडील रक्कम x दिवसात समान होते असे मानू.
संजयला ३ दिवसांचा ५००० रुपये पगार मिळतो.
∴ संजयला x दिवसांत मिळणारा पगार = ५०००x/३ रुपये
राधू मिस्तरीला ५ दिवसांचे ६००० रुपये मिळतात.
∴ राधू मिस्तरीला x दिवसांत मिळणारा पगार = ६०००x/५ रुपये.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(५०००x/३) – ( ६०००x/५ ) = ७०००
∴ (२५०००x – १८०००x )/१५ = ७०००
∴ ७०००x/१५ = ७०००
∴ x = ७००० × १५/७०००
∴ x = १५
➡️ हे १५ दिवसांत घडेल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(2) Comments