✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४६ ✍️
समृद्धी , दिविजा , इरा आणि स्वरा यांच्या वयांची बेरीज २६ वर्षे आहे. दिविजाचे वय स्वराच्या दुप्पट आहे. इरा दिविजापेक्षा एक वर्षाने मोठी तर समृद्धीपेक्षा ३ वर्षाने लहान आहे. तर दिविजाचे वय किती?
➡️ उत्तर :-
स्वराचे वय x वर्ष आहे असे मानू.
∴ दिविजाचे वय = २x वर्षे
∴ इराचे वय = (२x + १) वर्षे
∴ समृद्धीचे वय = (२x + १ + ३ ) = (२x+४) वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x + २x + २x + १ + २x + ४ = २६
∴ ७x + ५ = २६
∴ ७x = २६ – ५
∴ ७x = २१
∴ x = २१ / ७
∴ x = ३……..(i)
➡️ दिविजाचे वय = २x
∴ दिविजाचे वय = २ × ३ …….(i वरून)
∴ दिविजाचे वय = ६ वर्षे
➡️ दिविजाचे वय ६ वर्षे आहे
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(3) Comments