✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४७ ✍️
अढीत असणाऱ्या १००० किलो आंब्यापैकी काही आंबे नारायण १०% नफ्याने तर उर्वरित आंबे २०% नफ्याने विकतो. या संपूर्ण व्यवहारात त्याला १६% नफा होतो तर त्याने किती आंबे १०% नफ्याने विकले?
➡️ उत्तर :-
नारायणने x किलो आंबे १०% नफ्याने तर y किलो आंबे २०% नफ्याने विकले असे मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
x + y = १०००……..(i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
x चे १०% + y चे २०% = १००० चे १६%
∴ x (१०/१००) + y (२०/१००) = १००० (१६/१००)
∴ १०x + २०y = १००० × १६ ……..(समीकरणाला १०० ने गुणून )
∴ x + २y = १६००………(ii) ( समीकरणाला १० ने भागून )
➡️ समीकरण (i) ला २ ने गुणून
२x + २y = २००० …….(iii)
➡️ समीकरण (iii) मधून समीकरण (ii) वजा करून
x = ४००
➡️ नारायणने ४०० किलो आंबे १०% नफ्याने विकले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(3) Comments