✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१४८ ✍️
बँकेचा (सरळ)व्याजदर ८.५% हुन ७.५% झाल्यामुळे माणिकरावांचे वार्षिक उत्पन्न (व्याज) दहा हजार रुपयांनी कमी झाले तर माणिकरावांनी बँकेत किती रक्कम गुंतवली आहे?
➡️ उत्तर :-
माणिकरावांनी x रुपये बँकेत गुंतविले आहेत असे मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
सरळव्याज = मुद्दल × व्याजदर × मुदत / १००
➡️ व्याजदर ८.५ % असताना मिळणारे वार्षिक सरळव्याज
= x × ८.५ × १ / १००
= x × ८५ / १०००
= १७x/२०० रुपये.
➡️ व्याजदर ७.५ % असताना मिळणारे वार्षिक सरळव्याज
= x × ७.५ × १ / १००
= x × ७५ / १०००
= १५x/२०० रुपये.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(१७x / २००) – ( १५x / २००) = १००००
∴ २x / २०० = १००००
∴ x / १०० = १००००
∴ x = १०००० × १००
∴ x = १०००००० रुपये.
➡️ माणिकरावांनी बँकेत दहा लाख रुपये गुंतवले आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

