✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१३७ ✍️
अमरचा चालण्याचा वेग ४ किमी प्रतितास असून समरचा चालण्याचा वेग ५ किमी प्रतितास आहे. एकदा अमर आणि समर यांनी एकाच ठिकाणाहून एकाचवेळी चालण्यास सुरुवात केली आणि नियोजित स्थळी समर अमरच्या १५ मिनिटे अगोदर पोहोचला. तर ते नियोजित स्थळ सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंतरावर होते?
➡️ उत्तर :-
ते नियोजित स्थळ सुरुवातीच्या ठिकाणापासून x किमी अंतरावर आहे असे मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / काळ
∴ ते अंतर पार करण्यास अमरला लागलेला वेळ = x/४ तास तर तेच अंतर पार करण्यासाठी समरला लागलेला वेळ = x/५ तास
➡️ ६० मिनिटे = १ तास
∴ १५ मिनिटे = १/४ तास ……( ४ ने भागून )
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(x/४) – (x/५) = १/४
∴ ( ५x – ४x)/ २० = १/४
∴ x = २० × १/४
∴ x = ५ किमी
➡️ म्हणून ते नियोजित स्थळ सुरुवातीच्या ठिकाणाहून ५ किमी अंतरावर होते.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

