✍️गणिताशी गट्टी क्र.१३✍️
✍️एका स्पर्धापरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थी गणितात तर ७५ विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. जर ४८ विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण असतील तर इंग्रजी किंवा गणित या विषयात उत्तीर्ण होणारे एकूण विद्यार्थी किती?
➡️समजा, A हा इंग्रजीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे.
म्हणून n( A ) = ७५
समजा, B हा गणितात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे.
म्हणून n( B ) = ७०
➡️४८ विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहेत.
म्हणून n( A∩B ) = ४८
म्हणून
n ( A∪B) = n(A) + n(B) – n(A∩B)
n ( A∪B) = ७५ + ७० – ४८
n ( A∪B) = १४५ – ४८
n ( A∪B) = ९७
➡️म्हणून इंग्रजी किंवा गणित या विषयात एकूण ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

