✍️गणिताशी गट्टी क्र.२३✍️
✍️सेवानिवृत्त झालेल्या रामरावांनी भविष्य निर्वाह निधी तील काही रक्कम बँकेतून काढून आणली व तिच्या ( आणलेल्या रक्कमेच्या ) ५/१२ पट रक्कम थोरल्या मुलाला तर २५००० रुपये मधल्या मुलीला दिवाळीनिमित्त भेट दिले. थोरल्याला व मधल्या मुलीला एकत्रित जितकी रक्कम दिली तितकीच रक्कम धाकट्या मुलाला भेट दिली तर त्यांनी धाकट्या मुलाला किती रक्कम भेट दिली?
➡️ रामरावांनी बँकेतून x रुपये काढून आणले असे मानू.
थोरल्या मुलाला दिलेली रक्कम = ५x/१२
मधल्या मुलीला दिलेली रक्कम = २५००० रुपये.
धाकट्या मुलाला दिलेली रक्कम = (५x/१२) + २५०००
➡️ दिलेल्या अटीवरून,
२( २५००० + ५x/१२) = x
२५००० + ५x/१२ = x/२
x/२ – ५x/१२ = २५०००
६x/१२ – ५x/१२ = २५०००
१x/१२ = २५०००
x = २५००० × १२
x = ३००००० रुपये
➡️ म्हणून धाकट्या मुलाला दिलेली रक्कम
= (५x/१२) + २५०००
= ( ५ × ३०००००/१२) + २५०००
= १२५००० + २५०००
= १५०००० रुपये.
➡️ म्हणून रामरावांनी धाकट्या मुलाला १५०००० रुपये भेट म्हणून दिले.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

