✍️गणिताशी गट्टी क्र.२७✍️
✍️ रविवारी दहावी जादा तासिकेचा वर्ग सकाळी आठ वाजता सुरू झाला आणि सकाळी ११:५५ वाजता संपला. या कालावधीत एकूण चार तासिका झाल्या. प्रत्येक तासिकेनंतर विद्यार्थ्यांना ५ मिनिटांची सुट्टी दिली गेली तर एक तासिका किती मिनिटांची होती?
➡️ एक तासिका x मिनिटांची होती असे मानू.
वर्ग सकाळी आठ वाजता सुरू होऊन सकाळी ११:५५ वाजता संपला.
➡️ म्हणून वर्ग कालावधी
= ११:५५ – ८:००
= ३ तास ५५ मिनिटे
= ३× ६० मिनिटे + ५५ मिनिटे
= १८० मिनिटे + ५५ मिनिटे
= २३५ मिनिटे.
➡️ प्रत्येक तासिकेनंतर ५ मिनिटांची सुट्टी होती.
म्हणून सुट्टीचा कालावधी
=३ × ५
= १५ मिनिटे
➡️ दिलेल्या अटीवरून,
४x + १५ = २३५
४x = २३५ – १५
४x = २२०
x = २२०/४
x = ५५ मिनिटे
➡️ म्हणून एक तासिका ५५ मिनिटांची होती.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

