✍️गणिताशी गट्टी क्र.३०✍️
डिस्काऊंट द्या या ग्राहकांच्या मागणीने बेजार झालेल्या सर्वोदय साडीच्या दुकानदाराने साडीची किंमत २५% ने वाढवली आणि ग्राहकांना २०% डिस्काऊंट देऊन साडी विकण्यास सुरुवात केली तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा होईल?
➡️ साडीची विक्री किंमत ₹ १०० होती असे मानू.
साडीची वाढवलेली किंमत = ₹ १२५.
डिस्काऊंट = २०%
एकूण डिस्काऊंट
= १२५ चे २०%
= १२५ × २०/१००
= ₹ २५.
➡️ डिस्काऊंट दिल्यानंतर साडीची विक्री किंमत
= १२५ – २५
= ₹ १००
म्हणून नफा
= १०० – १००
= ०
➡️ म्हणून या व्यवहारात त्यांना ०% नफा होईल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

