✍️गणिताशी गट्टी-क्र.३३✍️
एक मनुष्य १४ किमी प्रतितास या वेगाने दिल्लीहून झाशीच्या दिशेने रेल्वेमार्गालगत धावत आहे त्याच दिशेने जाणारी ४०० मीटर लांबीची गतिमान एक्सप्रेस त्याला १० सेकंदात ओलांडते तर गतिमान एक्सप्रेसचा वेग किती असेल?
➡️ समजा गतिमान एक्सप्रेसचा वेग x किमी प्रतितास आहे.
म्हणून गतिमान एक्सप्रेसचा मनुष्य सापेक्ष वेग = ( x – १४ ) किमी प्रति तास
➡️ वेग = अंतर / काळ हे सूत्र आपणास माहिती आहेच.
दिलेल्या अटीवरून,
( x – १४) = ४०० मीटर/१० सेकंद
( x – १४ ) = (४००/१०००)/(१०/३६००) किमी प्रतितास
x – १४ = (४००/१०००)(३६००/१०)
x – १४ = ४ × ३६
x – १४ = १४४
x = १४४ + १४
➡️ x = १५८ किमी प्रतितास
➡️ म्हणून गतिमान एक्सप्रेसचा वेग १५८ किमी प्रतितास आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

