✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९✍️
राजेशच्या व त्याच्या वडिलांच्या सध्याच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय राजेशच्या वयाच्या चौपट होते तर चार वर्षानंतर राजेशचे वय किती असेल?
➡️ उत्तर :-
राजेशचे सध्याचे वय x वर्षे मानू.
म्हणून,
त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ – x ) वर्षे
➡️ चार वर्षांपूर्वी
राजेशचे वय = ( x – ४ ) वर्षे
त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ – x – ४ ) = ( ४४ – x ) वर्षे
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
४४ – x = ४ (x – ४ )
४४ – x = ४x – १६
४४ + १६ = ४x + x
५x = ६०
x = ६० / ५
x = १२ वर्षे
राजेशचे सध्याचे वय १२ वर्षे आहे.
➡️म्हणून चार वर्षानंतर राजेशचे वय १६ वर्षे असेल.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

