✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७१✍️
पाण्याचे लहान पिंप ५/७ इतके भरलेले आहे. त्यातील ५ लिटर पाणी काढून घेऊन त्यात ११ लिटर पाणी ओतले असता ते पिंप ४/५ इतके भरते तर त्या पिंपाची क्षमता किती ?
➡️ उत्तर :-
त्या पिंपाची क्षमता x लिटर आहे असे मानू.
∴ सुरवातीला पिंपामध्ये असणारे पाणी = ५x/७ लिटर.
त्यातील ५ लिटर पाणी काढून ११ लिटर पाणी त्यात ओतले म्हणजे त्या पिंपात ६ लिटर पाण्याची भर पडली.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
( ४x/५ ) – ( ५x/७ ) = ६
∴ ( २८x – २५x )/३५ = ६
∴ ३x/३५ = ६
∴ x = ६ × ३५/३
∴ x = २ × ३५
∴ x = ७० लिटर
➡️ त्या पिंपाची क्षमता ७० लिटर आहे.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


(1) Comment