✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४१✍️
अमरचे वजन अकबराच्या वजनांपेक्षा जितके जास्त आहे तितकेच ते अँथनीच्या वजनांपेक्षा कमी आहे. जर तिघांच्या वजनांची बेरीज २२५ किलो असेल तर अमरचे वजन किती?
उत्तर :-
➡️ अमरचे वजन x किलो , अकबराचे वजन y किलो तर अमरचे वजन z किलो मानू.
➡️म्हणून ,
x + y + z = २२५………..(i)
➡️दिलेल्या अटीवरून,
x – y = z – x
➡️म्हणून,
x + x = z + y
२x = z + y
२x + x = x + y + z …… (समीकरणाच्या दोन्ही बाजूस x मिळवून)
३x = x + y + z
३x = २२५ …….( i वरून )
x = २२५/३
x = ७५ किलो.
➡️म्हणून अमरचे वजन ७५ किलो आहे.
©अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

