✍️गणिताशी गट्टी क्र-२०✍️
पत्त्यांच्या कॅटमधील काही पत्ते हरवले आहेत. पत्ते तिघांत वाटले तर दोन पत्ते उरतात. चौघांत वाटले तर एकही उरत नाही आणि पाच जणांत वाटले तर चार पत्ते उरतात. तर त्या कॅटमधील किती पत्ते हरवले आहेत?
➡️ पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण ५२ पत्ते असतात.
पहिल्या अटींचे समाधान करणाऱ्या संख्या:-
➡️ ५, ८, ११, १४, १७, २०, २३, २६, २९, ३२, ३५, ३८, ४१, ४४, ४७, ५०.
दुसऱ्या अटींचे समाधान करणाऱ्या संख्या :-
➡️ ४, ८, १२, १६, २०, २४, २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५२.
तिसऱ्या अटींचे समाधान करणाऱ्या संख्या:-
९, १४, १९, २४, २९, ३४, ३९, ४४, ४९.
उदाहरणातील तिन्ही अटींचे पालन करणारी संख्या :- ४४
म्हणजे त्या कॅटमध्ये ४४ पत्ते उरले आहेत.
म्हणून त्या कॅटमधून ५२ – ४४ = ८ पत्ते हरवले आहेत.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

