✍️गणिताशी गट्टी क्र-२४✍️
गोपालदास गवळी ज्या किमतीला दूध खरेदी करतो त्याच किमतीला विकत असल्याचा दावा करत होता. त्याला विश्वासात घेऊन विचारले असता दुधात पाणी मिसळून ३०% नफा कमवत असल्याचे त्याने कबूल केले. तर तो विकत असलेल्या दुधात ( मिश्रणात) शुद्ध दूध किती टक्के होते?
➡️ गोपालदास १०० रुपयाला १ लिटर दूध घेतो असे मानू.
खरेदी किंमत व विक्री किंमत समान असली तरी पाणी मिसळून ३०% नफा तो कमवत आहे.
तो दुधात x लिटर पाणी मिसळतो असे मानू.
म्हणून विक्रीसाठी उपलब्ध दूध (मिश्रण ) = (१+x) लिटर
म्हणून एकूण विक्री किंमत = १००(१+x) रुपये
नफा = विक्री किंमत – खरेदी किंमत
नफा = १००(१+x) – १००
नफा = १०० + १००x – १००
नफा = १००x
➡️ शेकडा नफा = (नफा/खरेदी किंमत )१००
३० = (१००x/१००)१००
३० = १००x
x = ३०/१००
x = ३/१० लिटर
➡️ म्हणून १ लिटर दुधात गोपालदास ३/१० लिटर पाणी मिसळतो.
म्हणून मिश्रणातील दूध व पाणी यांचे प्रमाण
= १ : ३/१०
= १० : ३
➡️म्हणून मिश्रणातील दुधाची टक्केवारी
= (१०/१३) १००
= १०००/१३
= ७६.९२
➡️म्हणून गोपालदास विकत असलेल्या दुधात ( मिश्रणात ) शुद्ध दूध ७६.९२% आहे.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

