✍️गणिताशी गट्टी क्र.३१✍️
शालेय शिक्षण आणि वाचन संस्कृती परिषद रंगस्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. एका रांगेत जेवढी आसने होती त्याच्या दोन पंचमांश ( २/५ ) रांगा होत्या. प्रत्येक रांगेतील आसनांची संख्या एकूण रांगांच्या दुपटीपेक्षा ५ ने जास्त आहे. सभागृहातील एकही आसन रिक्त नसेल तर परिषदेसाठी किती प्रतिनिधी उपस्थित होते?
➡️ एका रांगेतील आसनांची संख्या x तर एकूण रांगा y आहेत असे मानू.
पहिल्या अटीवरून,
y = (२/५) x
२x = ५y
२x – ५y = ० ……(i)
दुसऱ्या अटीवरून,
x = २y + ५ …….(ii)
➡️ x = २y + ५ ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून
२(२y + ५) – ५y = ०
४y + १० – ५y = ०
४y – ५y = -१०
-y = -१०
y = १०
➡️ y = १० ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून
x = २(१०) + ५
x = २० + ५
x = २५
➡️ म्हणून, परिषदेला उपस्थित एकूण प्रतिनिधी
= xy
= २५ × १०
= २५०
➡️ म्हणून शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती परिषदेसाठी रंगस्वर सभागृहात एकूण २५० प्रतिनिधी उपस्थित होते.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

