✍️गणिताशी गट्टी क्र.३४✍️
आचार्य विद्यानिकेतन शाळेतील प्रत्येक तुकडीत ४० विद्यार्थी होते. नवीन प्रवेश झाल्यामुळे पाच तुकड्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक तुकडीत ३५ विद्यार्थी तसेच एकूण तुकड्या २६ झाल्या तर शाळेत किती नवीन प्रवेश झाले?
➡️ आचार्य विद्यानिकेतन शाळेत x नवीन प्रवेश झाले असे मानू.
सध्या २६ तुकड्या आहेत म्हणजे पूर्वी २६ – ५ = २१ तुकड्या होत्या.
➡️ दिलेल्या अटीवरून,
४० × २१ + x = ३५ × २६
८४० + x = ९१०
x = ९१० – ८४०
x = ७०
➡️ म्हणून आचार्य विद्यानिकेतन शाळेत एकुण ७० नवीन प्रवेश झाले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

