✍️गणिताशी गट्टी-क्र.३✍️
✍️ प्रत्येकी १०० मीटर लांबी असलेल्या दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना एकमेकींना ८ सेकंदात ओलांडतात. जर एका रेल्वेचा वेग दुसरीच्या दुप्पट असेल तर त्या(जलद) रेल्वेचा वेग काढा.
➡️ समजा संथ रेल्वेचा वेग x मीटर प्रतिसेकंद मानू
म्हणून जलद रेल्वेचा वेग = २x मीटर प्रति सेकंद
दोन्ही रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत
म्हणून सापेक्ष वेग = x + २x = ३x मीटर प्रतिसेकंद…..(i)
प्रत्येकी १०० मीटर लांबी असलेल्या दोन्ही रेल्वे एकमेकींना ८ सेकंदांत ओलांडतात.
म्हणून ८ सेकंदात त्यांनी कापलेले एकूण अंतर
= १०० + १००
= २०० मीटर…….(ii)
वेग = अंतर / काल हे सूत्र आपल्याला माहिती आहे….(iii)
तसेच १ मीटर प्रति सेकंद
= (१/१०००) / १/३६००) किमी प्रतितास
= ३६००/१००० किमी प्रतितास
= १८/५ किमी प्रतितास…….(iv)
➡️ म्हणून दिलेल्या अटीवरून
३x = २००/८…..( i, ii, iii वरून)
३x = २५
x = २५/ ३ मीटर प्रतिसेकंद
x = (२५/३)( १८/५ ) किमी प्रति तास….( iv वरून)
x = ३० किमी प्रतितास
म्हणून जलद रेल्वेचा वेग
= २x
= २×३०
= ६० किमी प्रतितास
➡️म्हणून जलद रेल्वेचा वेग ६० किमी प्रतितास आहे.
धन्यवाद!
अजित तिजोरे
8097617020
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

