✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ३८✍️
रमेशने ३००००० रुपये सरळव्याजाने कर्जाऊ घेतले. जर परतफेडीच्या मुदतीच्या तिप्पट व्याजदर असेल आणि त्याने व्याजापोटी १४४००० रुपये भरले असतील तर कर्जफेडीची मुदत किती वर्ष होती?
➡️दिलेल्या माहितीनुसार,
व्याजदर ( द ) = ३ × मुदत ( क )……..(i)
मुद्दल ( म ) = ₹ ३,००,००० ……….(ii)
➡️आपल्याला माहिती आहे की,
( म × द × क ) / १०० = सरळव्याज
➡️म्हणून,
( ३,००,००० × ३क × क ) / १०० = १,४४,००० …( i व ii वरून )
३,००० × ३ × क^२ = १, ४४, ०००
क^२ = १,४४,००० / ( ३,००० × ३)
क^२ = १४४ / ९
क^२ = १६
➡️म्हणून क = ४ …….( वर्गमूळ घेऊन )
➡️ कर्जफेडीची मुदत ४ वर्षे होती.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

