✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १५० ✍️
न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील ( एन. एस. एस. )एकूण मुलींपैकी १/६ मुलींची आणि एकूण मुलांच्या १/९ मुलांची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली. निवड झालेल्या एकूण एकोणीस विद्यार्थ्यांपैकी ७ मुली असतील तर न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत एकूण किती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत?
➡️ उत्तर :-
न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत x मुली आणि y मुले सहभागी झाले आहेत असे मानू.
∴ न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेले एकूण विद्यार्थी = x + y
➡️दिलेल्या माहितीनुसार,
(१/६)x = ७
∴ x = ७ × ६
∴ x = ४२……..(i)
निवड झालेल्या एकूण एकोणीस विद्यार्थ्यांपैकी ७ मुली आहेत.
∴ निवड झालेली मुले = १९ – ७ = १२
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
(१/९) y = १२
∴ y = १२ × ९
∴ y = १०८ ………(ii)
➡️ न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेले एकूण विद्यार्थी
= x + y
= ४२ + १०८ …….( i व ii वरून )
= १५०
➡️ न्यू आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेत एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

