✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १६८ ✍️
गणेश स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी प्रत्येक सदस्याने क्लबच्या एकूण सदस्यसंख्येइतके रुपये वर्गणी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. जर एकूण १२३२१ रुपये मदत त्यांनी महाड येथील पूरग्रस्तांना पाठवली असेल तर गणेश स्पोर्ट्स क्लबचे एकूण किती सदस्य आहेत?
➡️ उत्तर :-
गणेश स्पोर्ट्स क्लब चे एकूण सदस्य x आहेत असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x × x = १२३२१
x² = १२३२१
x = १११……..( वर्गमूळ घेऊन )
➡️ गणेश स्पोर्ट्स क्लब चे एकूण १११ सदस्य आहेत.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

