✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १७३ ✍️
ओजसची दहावीच्या परीक्षेत पाच विषयांची सरासरी ८९ होती. संस्कृत वगळता इतर चार विषयांची सरासरी ८८ असेल तर ओजसला संस्कृत विषयामध्ये किती गुण मिळाले?
➡️ उत्तर :-
ओजसला संस्कृत विषयामध्ये x गुण मिळाले असे मानू.
आता,
संस्कृतसह पाच विषयांतील गुणांची बेरीज = ५ × ८९ = ४४५
संस्कृत वगळून चार विषयांतील गुणांची बेरीज = ४ × ८८ = ३५२
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
संस्कृत विषयाचे गुण = संस्कृतसह पाच विषयांतील गुणांची बेरीज – संस्कृत वगळून चार विषयांतील गुणांची बेरीज
∴ x = ४४५ – ३५२
∴ x = ९३
➡️ ओजसला संस्कृत विषयामध्ये ९३ गुण मिळाले.
© अजित तिजोरे – ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

